पोलिसांनी केली जखमी घोड्यांची मुक्तता

मुंबई - पोलिसांनी पेटा, अॅनिमल वेल्फेअर बोर्ड आणि अॅनिमल राहात संस्थेच्या मदतीनं तीन जखमी घोड्यांना व्हिक्टोरिया घोडा गाडीच्या मालकांच्या तावडीमधून मुक्त केलंय.

हे तीनही घोडे खुपचं अशक्त, कुपोषित होते तसंच त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर जखमा होत्या. त्या जखमा लपवण्यासाठी त्यांच्यावर काळे कापड ठेवले जात होते. त्यांच्या खुरामध्ये भेगा पडल्या होत्या. तसंच घोड्यांच्या खुरामध्ये लॅमिनिट्स सारख्या रोगाची लागण झाली होती. मुंबई पोलीस अॅक्ट 1951 च्या वाहतूक नियमानुसार मरिन ड्राइव्हमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर व्हिक्टोरिया घोडागाडी आणण्यास बंदी आहे. या ठिकाणावरून जप्त करण्यात आलेल्या जखमी घोड्यांना परळमधील प्राण्यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. अॅनिमल वेल्फेअर बोर्डानं आतापर्यंत नऊ घोड्यांना ताब्यात घेतलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या