पायधोनी मृत्यू गूढ उलगडलं! कलिंगडमुळे नाही तर...

मुंबईतील पायधोनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुरुवातीला कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, तपासात या चौघांचा मृत्यू उंदिर मारण्याच्या विषामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तपासादरम्यान मृतांच्या शरीरात ‘झिंक फॉस्फाईड’ या घातक उंदिर मारण्याच्या विषाचे अंश आढळले. विशेष म्हणजे, त्यांनी खाल्लेल्या कलिंगडाच्या नमुन्यांमध्येही हेच विष सापडले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता नव्या दिशेने सुरू झाला असून, हे विष कलिंगडात कसे मिसळले गेले याचा शोध पोलीस घेत आहेत.

26 तारखेला अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. चौघांनी रात्री कलिंगड खाल्लं होतं त्यामुळे कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. 26 तारखेला अब्दुल्ला डोकाडिया (44) त्यांची पत्नी नसरीन (35) आयेशा (16) आणि झैनब (13) यांचा अचानक मृत्यू झाला होता. 

फॉरेन्सिक रिपोर्ट शरीरातील अवयव हिरवे पडले...

सुरुवातील फूड पॉइजनिंगचं प्रकरण असल्याचं मानलं जात होतं. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमुळे प्रकरणाने वेगळच वळण घेतलं. सूत्रांनुसार, जेव्हा मृतांच्या शरीराचा तपास झाला, तेव्हा डॉक्टरही हैराण झाले. मृतांचे अंतर्गत अवयव म्हणजेच मेंदू, हृदय आणि आतड्यांचा रंग हिरवा झाला होता. सर्वसाधारणपणे शरीरातील अवयवांचा रंग बदलण्यामागील कारण विषामुळे होत असल्याचं दिसतं.

एफडीएकडून तपास...

या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट FDA म्हणजे फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनचा रिपोर्ट समोर आल्यानंतर झाला. अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातील वेगवेगळ्या 11 पदार्थांचे नमुने घेतले. यामध्ये रात्रीची बिर्याणी, कलिंगडाचे तुकडे, फ्रिजमधील पाणी, तांदूळ, चिकन, खजूर आणि मसाल्यांचा समावेश होता. हैराण करणारी बाब म्हणजे या सर्व पदार्थांमध्ये कोणतंही विषारी द्रव्य आढळून आलं नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या