गुलशन कुमारच्या हत्येची टीप आधीच मिळाली होती - राकेश मारिया

शीनाबोरा हत्याकांडानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या पुस्तकातून नवनवी खुलासे आता समोर येऊ लागले आहे. टी सिरिजचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येची माहिती आधीच मिळाली असल्याचा खुलासा राकेश मारिया यांनी पुस्तकात केला आहे. 

 ९० च्या काळात गुलश कुमार यांचा कॅसेटचा धंदा जोरात सुरू होता. त्यांच्या अनेक गितांसाठी ते गायकांना संधी देत होते. तर काही चित्रपटांची निर्मिती ही गुलशन कुमार करत होते. अवघ्या काही वर्षात गुलशन कुमार यांनी कोट्यावधी रुपये कमावले होते. सकाळची पहाट ही  त्यांच्या भक्तीगितांनीच सुरू व्हायची. त्याच वेळी मारिया यांना एक निनावी फोन आला. त्या फोनवर ‘सर, गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है ! अशी माहिती मारिया यांना देण्यात आली. पुढील चौकशीत त्यांची हत्या डी गँग म्हणजेच दाऊदचा हस्त छोटा शकीलकडून केली जाणार असल्याचे कळाले. गुलशन कुमार हे दररोज सकाळी शंकराच्या मंदीरात दर्शनासाठी जायचे. त्याच वेळी त्यांना ठार मारण्याचा प्लॅन बनवल्याची माहिती मिळाल्यानंतर मारिया यांनी 

महेश भट्ट यांना केला.  महेश भट्ट यांच्याजवळ मारिया यांनी गुलशन कुमार यांची चौकशी केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुलशन कुमार यांच्या जिवाला धोका असल्याचे कळवले. तसेच त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले.  मात्र १२ ऑगस्ट १९९७  गुलश कुमार यांची जुहूच्या जीत नगर येथील शंकराच्या मंदीराबाहेर हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मारिया यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता. उत्तर प्रदेश पोलिस आणि कमांडो यांनी गुलशन कुमार यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी संरक्षण काढून घेतलं. मात्र काही महिने उलटल्यानंतर गुलशन कुमार यांच्यावरचा जीवाचा धोका टळला असं सांगत, त्यांनी सुरक्षा कमी केली. त्यामुळे  उत्तरप्रदेशचे पोलिस बेसावध असताना. डी गँगकडून गुलशकुमार याचा काटा काढण्यात आला. हा कट कित्येक महिन्यापूर्वी रचला होता. आणि त्याची माहिती मारिया यांना होती असे त्यांनी आपल्या पुस्तत म्हटलं आहे. 

 

 

 

 

 

 

पुढील बातमी
इतर बातम्या