रेल्वे पोलिसांची जनजागृती

चेंबुर : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी रेल्वे पटरीजवळ राहणाऱ्या झोपडपट्टी भागात जनजागृती करायला सुरुवात केली आहे. शनिवारी वडाळा रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील पोलिसांनी चेंबुर रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीत जाऊन जनजागृतीचे काम हाती घेतले. एखादी संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे आणि येणाऱ्या सणांसाठी ही सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या