कुर्ला स्थानकात चोर-पोलिसाचा पाठशिवणीचा खेळ

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • क्राइम

मुंबईच्या कुर्ला स्थानकात प्रवाशांना गुरूवारी चोर आणि पोलिस यांचा पाठशिवणीचा खेळ अनुभवायला मिळाला.

काय आहे घटना?

गुरूवारी सकाळी १० वाजता पनवेलला जाणारी गाडी हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्मवर आली. गाडी सुटताच एका मोबाईल चोराने प्रवाशाचा मोबाईल खेचला आणि पळ काढला. प्रवाशाने चोर-चोर असं ओरडत त्याच्या मागे पळायला सुरूवात केली. पण, चोराचा पाठलाग करणं त्याला जमलं नाही. सुदैवाने प्लॅटफॉर्मवरील आरपीएफच्या जवानांनी त्याचं ओरडणं एेकलं आणि मग सुरू झाला चोर पोलिसांचा खेळ.

ट्रॅकवर उडी

पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी या चोराने थेट ट्रॅकवर उडी घेतली आणि पळू लागला. पण, जीवाची पर्वा न करता आरपीएफचे जवान देखील ट्रॅकवर उतरले आणि त्यांनी या चोराला अखेर पकडलं. प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सर्व घटना कैद झाली.

आरपीएफच्या या कामगिरीचं सर्वांनीच कौतुक केलं. प्रवाशाला त्याचा फोनही मिळाला असून चोराला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या