रशियन महिलेचा विनयभंग, नराधमाचा शोध सुरू

मुंबईत महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाही. आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. बोरीवली परिसरात एका रशियन महिलेचा विनयभंग झाला आहे. या प्रकरणी एम. एच. बी. पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसह गुन्हे शाखा देखील या नाराधमाचा शोध घेत आहे.

सांगितले जात आहे की, 40 वर्षीय रशियन महिला ही घरी जात होती. घरी जाण्यासाठी तिने बोरिवाली स्टेशनवरून रिक्षा पकडली आणि एलआईसी कॉलनी येथे उतरली. ती महिला काही पावले चालली तोच एक तरुण तिचा पाठलाग करत असल्याचे समजले. तो तरुण त्या महिलेला बघून काही पुटपुटत होता. त्याची भाषा रशियन महिलेला समजत नसली तरी तिने आपण वैश्या नसल्याचे या तरुणाला स्पष्ट केले. एवढे सांगून देखील तो विकृत महिलेच्या जवळ गेला आणि तिचा विनयभंग केला. 

महिला धास्तावली पण तिने धीर सोडाला नाही आणि किंचाळत तिने आपल्या हातातील हँड बॅगने तरुणाला मारले. तिच्या किंचाळण्याच्या आवाजाने शेजारच्या इमरतीतील सुरक्षा रक्षक देखील धावत आला. त्यांना बघताच त्या विकृताने तिथून पळ काढला. एवढं सगळ झाल्यावर महिला घरी गेली. तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. महिलेची तक्रार करण्याची इच्छा नव्हती. मात्र घरच्यांनी संगितल्यानंतर शुक्रवारी रात्री तिने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

महिलेच्या जबाबच्या आधारे पोलीस या विकृताचा शोध घेत आहेत. जवळपास 25 वर्षाचा तरुण मध्यम बंध्याचा असल्याचे महिलेने पोलिसांना संगितल. सध्या त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने पोलीस तसेच गुन्हे शाखा या नाराधमाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या