मानवी तस्करीप्रकरणी गुजरातच्या एजंटला अटक

तब्बल ५३ जणांना बनावट पासपोर्टवर अमेरिका आणि कॅनडाला पाठवल्या प्रकरणी सहार पोलिसांनी गुजरात येथील एका दलाला अटक केली आहे. बल्लू कानूभाई पटेल (४०) असं या एजंटचं नाव आहे. बल्लूच्या अटकेने या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या २० वर गेली आहे.

मे महिन्यांतलं प्रकरण

मे महिन्यात सहार पोलिसांनी बनावट पासपोर्टच्या आधारे अमेरिका आणि कॅनडात मानवी तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी या टोळीतील १९ जणांना अटक करण्यात आली होती. ज्यात तीन इमिग्रेशन अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

प्रत्येकी ५०-६० लाख उकळले

बल्लूने २०१५ ते २०१७ दरम्यान ५३ जणांना अमेरिका आणि कॅनडाला पाठवल्याचं तपासात उघड झालं आहे. त्याने परदेशात जाण्यासाठी प्रत्येकाकडून ५० ते ६० लाख रुपये घेतल्याचंही आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे.

गुजरात मधून अमेरिका आणि कॅनडाला जाण्याची इच्छा असलेल्यांना बल्लू मदत करायचा आणि त्यांच्याकडून ५० ते ६० लाख उकळल्यानंतर त्यांच्या पासपोर्टमध्ये फेरफार करून त्यांना परदेशात पाठवायचा. या कामात त्याला मुंबईतील सहकाऱ्यांची मदत व्हायची.

पुढील बातमी
इतर बातम्या