चिमुरडीला भोवला शाळेचा बेजबाबदारपणा

कांदिवली - येथील ठाकूर इंटरनॅशनल शाळेत सीनिअर केजीच्या वर्गात शिकणाऱ्या 5 वर्षांच्या जीविका या मुलीची बोटं दरवाजात चेंगरली. पण हा प्रकार लक्षात आल्यानंतर या मुलीला तातडीनं रुग्णालयात नेण्याऐवजी शिक्षकांनी तिच्यावर शाळेतच प्रथमोपचार केले. शिक्षकांनी प्रथमोपचार सुरू ठेवले त्या कालावधीत या चिमुरडीच्या बोटांतून मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह होत राहिला. या बेजबाबदारपणामुळे अखेर तिच्या हाताचं ऑपरेशन करावं लागलं. त्यामुळे नाराज झालेल्या जीविकाच्या आई-वडिलांनी शाळेबाहेर धरणं आंदोलनही केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या