चेंबुर रेल्वे स्कायवॉकची दुरवस्था

  • सुकेश बोराळे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

चेंबुर - चेंबुर रेल्वे स्टेशनजवळील स्कायवॉक. हा स्कायवॉक प्रवाशांसाठी बनवलाय की गर्दुले आणि भिकाऱ्यांसाठी हाच प्रश्न पडतोय. त्यामुळे इथून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आलाय. एमएमआरडीएनं कोटयवधी रुपये खर्च करून चेंबुर रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉक बांधला. मात्र एमएमआरडीच्या दुर्लक्षामुळे या स्कायवॉकची दुरवस्था झालीय. स्कायवॉकच्या लाद्या उखडल्यात, सुरक्षेसाठी लावण्यात आलेले रॉड्य तुटलेत, रात्री इथं लाइट्स बंद असतात.

"एमएमआरडीएनं हा स्कायवॉक आमच्याकडे दिलाय. मात्र स्कायवॉकच्या दुरावस्थेची मला कल्पना नाही. सोमवारी त्याठिकाणी अधिकाऱ्यांना पाठवून पाहणी करतो," असं आश्वासन चेंबूरचे वॉर्ड सहाय्यक ऑफिसर हर्षद काळे यांनी दिलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या