एसएनडीटीच्या जुहू कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू कॅम्पस येथील वसतिगृहाच्या वार्डनने विनयभंग केल्याचा गंभीर आरोप एका विद्यार्थिनीनं केला आहे. याप्रकरणी त्या विद्यार्थिनीनं सांताक्रूझ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान संध्याकाळी घडलेल्या या प्रकाराविरुद्ध काही विद्यार्थिनींनी निदर्शनं केल्यानं या ठिकाणी तणावाचं वातावरण पसरलं होतं.

प्रकरण काय?

हॉस्टेल परिसरात मुलींना स्लिव्हलेस कपडे परिधान करण्यास परवानगी नसताना एका विद्यार्थिनीने ते परिधान केले होते. मात्र आपल्या अंगावर रॅशेस आल्याने हे कपडे घातल्याचं तिने वार्डनला सांगितलं. परंतु, अंगावर आलेले रॅशेस पाहण्यासाठी वार्डनने आपल्याला कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक आरोप मुलीने केला आहे.

गुन्हा दाखल

घडलेल्या प्रकाराविरुद्ध संतप्त विद्यार्थिनींनी याठिकाणी आंदोलन सुरू केलं असून या वार्डनला कामावरून काढण्याची मागणी काही विद्यार्थिनींनी केली आहे. या संपूर्ण प्रकाराची एसएनडीटी विद्यापीठाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू केल्याची माहिती प्रशासनाने दिली. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या