2025 मध्ये Thane Police Commissionerate हद्दीत महिलांवर आणि अल्पवयीनांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत एकूण 516 लैंगिक अत्याचार आणि 813 विनयभंगाच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
या 516 प्रकरणांपैकी:
302 प्रकरणे 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत
214 प्रकरणे 18 वर्षांवरील महिलांशी संबंधित आहेत
नौपाडा परिसरात 7 वर्षांच्या मुलीवर 45 वर्षीय व्यक्तीकडून बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
ठाणे आयुक्तालयातील विविध भागांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. ठाणे ते दिवा हा पट्टा सर्वाधिक प्रभावित असल्याचे दिसून आले आहे.
ठाणे ते दिवा (झोन 1 आणि 5) – 185 प्रकरणे
डोंबिवली आणि कल्याण – 125 प्रकरणे
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर – 128 प्रकरणे
भिवंडी – 78 प्रकरणे
एकूण – 516 प्रकरणे
या आकडेवारीमुळे महिलां आणि अल्पवयीनांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
हेही वाचा