विम्यासाठी युट्युबवर बघून तरुणाने बनवला बॉम्ब! शिपमेंट कंपनीला लावली आग

चार लाखाचा कॉम्पुटर खरेदी करता यावा, म्हणून एक तरुणाने चक्क युट्युबवर (You Tube) व्हिडीओ पाहून बॉम्ब बनवला. यामुळे जोगेश्वरीतील (Jogeshwori Crime News) एका शिपमेंटला आग लागली होती. आग लागल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून विम्याचे पैसे मिळतील, आणि त्यातून आपल्याला लाखोचा कॉम्पुटर खरेदी करता येईल, असं प्लानिंग या मुलानं केलं होतं. पण हा प्लॅन फसला.

आग लावून नुकसान केल्याप्रकरणी जोगेश्वरीतल्या अल्पवयीन तरुणाला अटक (Minor Arrested) करण्यात आली आहे. या तरुणाच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघडकीस आली.

युट्युबवर या मुलानं घरात कुणीही नसताना व्हिडीओ पाहिला. व्हिडीओ पाहून इलेक्ट्रीक सर्किट बनवलं आणि पार्सल दिल्ल्याच्या एका खोट्या पत्त्यावर पाठवून दिलं. प्रवासात पार्सल फुटल्यास नुकसान भरपाई मिळेल असं या तरुणाला वाटलं होतं. त्यांनी त्याला चार लाखाचा कॉम्प्युटर आणि लाख रुपयांचा मोबाईल खरेदी करायचा होता.

पोलिसांनी सांगितले की, सांताक्रूझ येथील रहिवासी असलेल्या मुलाने बँकेच्या पॉलिसीची जाहिरात पाहिली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की ग्राहक विमा उतरवलेले असल्यास खराब झालेले किंवा हरवलेल्या पार्सलवर 110 टक्के परतावा मिळण्यास पात्र आहे. यामुळे त्याला झटपट पैसे कमविण्याची कल्पना आली. त्याने ऑनलाइन जाऊन बॉम्ब बनवण्याची क्लिप पाहिली.

त्यानंतर त्याने मोबाईल फोन, बॅटरी, फटाके आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट एकत्र करून बॉम्ब तयार केला. त्याने मंगळवारी रात्री 11 वाजता फोनवर अलार्म लावला, त्यामुळे तो कंपनातून स्फोट होऊन संपूर्ण जागा जळून खाक झाली.

मुलाने ते पार्सल ब्लू डार्ट कुरिअर कार्यालयात दिले. पोलिसांनी सांगितले की, मुलाने 9,81,800 रुपये किमतीचे गॅझेट असल्याचा दावा करून एक बीजक तयार केले आणि 10 लाख रुपयांची भरपाई मिळण्याच्या आशेने बँकेकडे त्याचा विमा उतरवला. जोगेश्वरी येथील त्यांच्या गोदामात पाठवण्यात आले.

रात्री 11 वाजता, अलार्म वाजला आणि एक छोटासा स्फोट झाला. पार्सल वेगळे ठेवले असल्याने मोठी आग लागली नाही. कुरिअर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फटाक्यांचे अवशेष सापडले आणि त्यांनी पोलिसांना सूचना दिली. एटीएस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि त्वरीत त्या मुलाचा शोध घेतला.

त्याला 27 जुलैपर्यंत डोंगरी रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे. मुलगा अभ्यासात चांगला आहे आणि तो एनईईटीला बसणार होता, असे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा

मुंबईत तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, गुप्तांगाला दिले मेणबत्तीचे चटके

कॉलेज प्रवेशासाठी अकरावीच्या मार्कशीटमध्ये छेडछाड, विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

पुढील बातमी
इतर बातम्या