चोराने क्षणातच मॅनहोलच्या जाळ्या केल्या गायब

मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील आराम नगरमध्ये एका ऑटो रिक्षातून चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत चार मॅनहोलच्या जाळ्या चोरून नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या चोरीमुळे पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

चोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेचा व्हिडिओ @AndheriLOCA या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चोरीचा हा प्रकार अत्यंत पूर्वनियोजित आणि जलद गतीने करण्यात आला. चोरट्यांनी मॅनहोलच्या जाळ्या काही मिनिटांतच काढल्या आणि ऑटोमध्ये ठेवून पसार झाले. या घटनेनंतर अनेक जण मॅनहोलच्या डिझाइनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 

चोरीमुळे केवळ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, तर करोडो रुपयांच्या करदात्यांच्या पैशांचाही अपव्यय झाला आहे. अशा चोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. अशा चोरांना पकडून त्यांना कायद्यानुसार शिक्षा देण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.


हेही वाचा

विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

पुढील बातमी
इतर बातम्या