ठाण्यातील 150 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिरात चोरी

  • राजश्री पतंगे & नितेश दूबे
  • क्राइम

ठाण्यातील प्राचीन गोवर्धन कृष्ण मंदिरात जन्मष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या मूर्तीसह दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. श्रीकृष्णाच्या १५० वर्षे जुन्या असलेल्या या मंदिरात ही चोरीची घटना घडली. जन्माष्टमीनिमित्ताने या मंदिरात उत्सवाची जय्यत तयारी सुरू होती. याचदरम्यान शनिवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी श्रीकृष्णाची मूर्ती आणि दागिन्यांची चोरी केली.

अशी केली चोरी

ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत गोवर्धन वैष्णव मंदिर हवेली या ठिकाणी असलेल्या श्रीकृष्णाच्या मंदिरातील दागिने आणि पैसे चोरीला गेले. दरम्यान दानपेटीत जमा झालेली रोख रक्कम, पुजाऱ्याकडे असलेले नऊ लाख रुपये आणि दागिने असा सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या मंदिरात लावलेल्या सीसीटीव्हीची यंत्रणा तोडून चोरट्यांनी ही चोरी केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या