लेखक भालचंद्र नेमाडे यांना धमकी

मराठी साहित्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांना एका अनोळखी नंबरवरुन धमकी आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार नेमाडे यांनी दोन आठवड्यांपूर्वी एका अनोळखी नंबरवरुन धमकीचा फोन आला होता. त्यानंतर वाकोला पोलीस ठाण्यात एक तक्रार करण्यात आली होती. भालचंद्र नेमाडे हे सध्या यवतमाळमध्ये आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतील वादग्रस्त उल्लेखामुळं नेमाडे यांना धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीत बंजारा समाजातील महिलाविषयी लिखाण करण्यातं आलेलं आहे. या लिखाणाबद्दल एका अज्ञात व्यक्तीनं आक्षेप घेतलाय. नेमाडे यांचं हे लिखाण बदनामीकारक आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या घरात घुसून मारहाण करु, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या