अबब... पोत्यात सापडले 10 कोटी

मानखुर्द - घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर छेडानगर येथे पोलिसांनी मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या MH-14 DJ - 0707 या निसान गाडीत 10 कोटी 10 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतलीय. ज्यात 10 कोटीच्या चलनातून बाद झालेल्या 500 रूपयांच्या नोटा असून, 10 लाख रुपयांच्या नवीन 2000 च्या नोटा आहेत. ही रोकड घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही रोकड वैद्यनाथ अर्बन सहकारी बॅंकेची असून, घाटकोपर शाखेतून पुण्यातील पिंपरी येथील शाखेत हे पैसे तीन इसम घेऊन जात होते. छेडानगर जंक्शन येथे ही मोटार एस. आर. म्हस्के आणि व्हि.एस. विधाते या वाहतूक पोलिसांनी अडवली असता यात काही गोणी असल्याचं त्यांना आढळले. त्यांनी विचारपूस केली असता त्यात रोकड असल्याचे त्यांना कळले. याबाबत वाहतूक पोलिसांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी या रोकडसह मोटारवाहन आणि 3 इसमाना ताब्यात घेतलंय. याबाबत पोलिसांनी आयकर विभागाला याची माहिती दिलेली असून, टिळक नगर पोलीस याचा तपास करीत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या