साडीचा झोका घेणं बेतलं मुलीच्या जीवावर

साडीचा झोका घेणं एका १३ वर्षीय मुलीच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. मुंबईतील धारावी परिसरात रविवारी ही घटना घडली. या घटनेनं कुटुंबियांना धक्का बसला आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मृत मुलगी धारावीतील राजीव गांधी नगर परिसरात कुटुंबियांसोबत राहायची. रविवारी संध्याकाळी ती नेहमी प्रमाणे आपल्या घराच्या पोटमळ्याला साडीने बांधलेल्या झोक्यावर खेळत होती.

झोका खेळत असताना अचानक तिचा तोल गेला. तिने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, साडीचा फास तिच्या गळ्याभोवती घट्ट झाल्यानं तिची शुद्ध हरपली.

मुलीला फास बसल्याचं लक्षात येताच नातेवाईकांनी तिला खाली उतरवत तात्काळ सायन रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारादरम्यान तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या