मोटारसायकलची चोरी केल्याच्या आरोपावरून झारखंडमध्ये २२ वर्षीय तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आली होती. यात गंभीर जखमी झालेल्या तरबेज अन्सारीचा आठ दिवसानंतर रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला धार्मिक ओढलावत सोशल मिडियावर नागरिकांची माथी भडकवणार्यां टिक टाँक फेम फैजल शेखसह चौघांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहेे.