पोलिस कारवाई रोखण्यासाठी तरुणांनी केले पोलिसाचेच अपहरण

मद्यधुंद तरुणांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाचे तरुणांनीच अपहरण केल्याची घटना मंगळवारी पूर्व द्रुतगती मार्गावर घडलीया प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी दोघांना ठाणे परिसरातून अटक केली आहेविराज शरद शिंदे (२१), गौरव मनोज पंजवाने(२९अशी या दोघांची नावे आहेतया दोघांचा तिसरा साथीदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

टिळकनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले विकास मुंडे हे घाटकोपरच्या छेडानगर जंक्शन येथे कर्तव्यास होतेत्यावेळी पूर्व द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या मधोमध उभी असल्याचे त्यांनी पाहून मुंडे हे कारच्या दिशेने गेलेत्यावेळी कारमध्ये तीन तरुण दारूच्या नशेत झोपले असल्याचे त्यांनी पाहिलेविकास मुंडे यांनी तिथे जाऊन या तरुणांना उठवले आणि गाडी बाजूस घेण्यास सांगितलेत्यावरून तिघेही तरुण मुंडे यांच्याशी अर्वाच्च भाषेत बोलू लागले. एवढ्यावरच न थांबता त्या तिघांनी मुंडे यांना धक्काबुक्की करण्यास सुरूवात केलीतिघेही पळण्याच्या तयारीत असल्याचे पाहून त्या तिघांनी तेथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केलामात्र मुंडे यांनी त्यांना रोखलेहे तिघेही पळून जाऊ नयेत म्हणून मुंडे त्याच्या गाडीत बसलेत्यावेळी तिघांनी गाडी पोलिस ठाण्यास न घेता ठाण्याच्या दिशेने पळवण्यास सुरूवात केली.

मात्र घाटकोपर येथील माता रमाबाई नगर येथे पोलिसांच्या नाकाबंदी पाहून त्याच्यातील एका साथीदाराने गाडीतून उडी टाकून पळ काढलानाकाबंदीत मुंडे यांची सुटका करत पोलिसांनी तिघांना ही ताब्यात घेतलेया प्रकरणी  टिळकनगर पोलिसांनी कलम ३३२३५३,३६५२८३ सह मोटर वाहन कायदा कलम १८५१८८ अंतर्गत गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या