दादरला टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

दादरच्या किर्ती कॉलेज परिसरात टेम्पोच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात मनीष ठाकूर आणि वेदांत नार्वेकर या महाविद्यालयीन मुलांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टेम्पोने दिली धडक

शिवाजी पार्क येथील किर्ती कॉलेज जंक्शन येथून वीर सावरकर रोडवरून हे दोन्ही विद्यार्थी दुचाकीहून निघाले होते. त्यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मनीष आणि वेदांता हे दोघे ही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने स्थानिकांनी शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी नेले.

उपचारांदरम्यान दोघांचा मृत्यू

उपचारांदरम्यान या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, मनीष आणि वेदांत यांचा प्रभादेवी येथील मित्र प्रज्ञेश मेस्त्रीने दिलेल्या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी टेम्पो चालकावर मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या