मुंबईत तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, गुप्तांगाला दिले मेणबत्तीचे चटके

३३ वर्षीय युवकावकर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याच्या गुप्तांगावर चक्क मेणबत्तीचे चटके देण्यात आले आहेत. मुलुंडमधील (Mulund Crime News) ही घटना आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनैसर्गिक अत्याचार करणारा ३४ वर्षीय आरोपी सुरेश म्हस्के या नराधमाविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सुरेश म्हस्के याने ३३ वर्षीय तक्रारदार असलेल्या तरुणाकडून काही पैसे उधार घेतले होते. हे पैसे परत देण्यास आरोपी टाळाटाळ करत होता, त्यामुळ तक्रारदार तरुणाने त्याच्याकडे अनेकदा पैशांचा तगादा लावून धरला होता.

६ जुलैला त्या तरुणाने आरोपीकडे पुन्हा पैशांची मागणी केली, त्यामुळे आरोपीला प्रचंड राग आला आणि हा राग अनावर झाला. आरोपीने दुपारी २ वाजता तरुणाला मुलुंड कॉलोनीत असलेल्या हिंदुस्तान चौकासमोरच्या गोडाऊनमध्ये गाठलं आणि त्याला मारहाण करत तरुणावर लैंगिक अत्याचार केले आहे.

यावेळी आरोपीने तरुणाच्या गुप्तांगात पाईप घातला. एवढ्यावरच न थांबता त्याने तरुणाच्या गुप्तांगाला मेणबत्तीचे चटकेही दिले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अनैसर्गिक अत्याचारामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सायनमधील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा

कॉलेज प्रवेशासाठी अकरावीच्या मार्कशीटमध्ये छेडछाड, विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

बेपत्ता एमबीबीएस विद्यार्थी: न्यायालयाकडून लाईफगार्डची नार्को चाचणी करण्यास परवानगी

पुढील बातमी
इतर बातम्या