सावधान! 'स्मार्ट टीव्ही' ठेवतोय तुमच्यावर 'वाॅच'

काही दिवसांपूर्वी एका हॅकरने 'स्मार्ट टीव्ही' हॅक करून पती-पत्नीचा खासगी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केला होता. तुमच्या घरात 'स्मार्ट टीव्ही' असेल, तर अशी वेळ तुमच्यावरही येऊ शकते. तसं होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, हे समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ बघाच.

'असे' होतात टीव्ही हॅक

 सध्या स्मार्ट टिव्हीची  मागणीनुसार बाजारात खूपच वाढलेली आहे. या स्मार्ट टिव्हींना संपर्क साधण्यासाठी टीव्हीच्या समोर एक कॅमेरा दिलेला आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक अॅप्लिकेशन इन्स्टाॅल करत असताना, कुठलीही परवानगी विचारली जात नाही. त्याचा फायदा घेऊन तुम्हाला फुकटात सेवा पुरवणारे अॅप आयपीद्वारे नकळत तुमच्या सर्वरशी जोडले जातात. तुमच्या न कळत इतर कुणीतरी टीव्ही आणि इंटरनेट सुरू असताना तुमचे टीव्हीसमोरील खासगी क्षण पाहू शकतात आणि रेकाॅर्डही करू शकतात. 


पुढील बातमी
इतर बातम्या