स्वत:ला उत्तरभारतीय नागरिकांचा नेता म्हणवून घेणाऱ्या विनय दुबेला मंगळवारी पोलिसांनी वांद्रे येथील कामगारंानी केलेल्या गर्दीस कारणीभूत म्हणून वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
उत्तर भारतात राहणाऱ्या व कामासाठी मुंबईत आलेल्या मजुरांना आपआपल्या राज्यात पाठवण्यासाठी आंदोलन छेडण्याची घोषणा क्ली होती. १८ तारखेला एकत्र जमून उत्तरप्रदेशच्या दिशेने चालत जाण्याचा निश्चय केला होता. सोशल मिडियावर नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत होता. पोलिस तपासात त्याच्या या आवहानंतरच वांद्रे येथे गर्दी झाल्याचे पुढे आल्यानंतर त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेत वांद्रे पोलिसांकडे सुपूर्द केले. पोलिसांनी त्याच्या विरोधात अफवा पसरवणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे, नागरिकांना एकत्र जमवणे, आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. बुधवारी दुबेला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.