पोस्को गाईडलाईन्स बुकलेट पुस्तक प्रकाशन

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

सीएसटी - मुलांचे संरक्षण आणि लैंगिक गुन्हे (पोस्को) अॅक्ट 2012 ची माहिती देणारे आणि त्याविषयी वारंवार विचारण्यात येणारे प्रश्नांची माहिती मराठीत प्रथमच पुस्तकबद्ध झाली आहे.

फोरम अगेन्सट चाईल्ड सेक्स्युल एक्सप्लोयटेशन आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्या सहकार्याने चाईल्ड सेक्स्युअल अब्युज या मराठी भाषेतील पुस्तकाचे मंगळवारी मुंबई प्रेस क्लब येथे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गेल्या तीन वर्षात बाल लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीनुसार (एनसीआरबी) 2102 साली 38,172 प्रकरणे, 2013 साली 58,224 प्रकरणे आणि 2014 साली 89,423 प्रकरणे मुलांबाबतच्या गुन्हेगारीतंर्गत दाखल झाल्याचे समोर आले आहे. बाललैंगिक शिक्षणाच्या प्रशिक्षणादरम्यान 2015 ला पोस्को कायद्याविषयी मराठीत पुस्तक लिहण्याची गरज असल्याचे लक्षात आले. त्यामुळे हे पुस्तक लिहिल्याचे लेखिका विद्या आपटे यांनी सांगितले. सध्या मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा किती आवश्यक आहे, याबाबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने भाष्य केले.या वेळी पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, मॅकवन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखिका विद्या आपटे महिला आणि बालक विभागाचे उपायुक्त डी.वी. देसावले उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या