अंधारामुळे वाढताहेत गुन्हे

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

वडाळा - बीपीटी वसाहतीतील रस्त्यावर पथदिवे बंद आहेत. त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्यांना त्रास होत आहे. दिवे बंद असल्याकारणाने चोरीचे प्रकार वाढले आहेत. तसंच वडाळा स्टेशनच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीच्या मागे अश्लील प्रकार घडत असतात. पण याकडे रेल्वे पोलीस आणि बीपीटी अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला असल्याचं येथील नागरिकांचे म्हणणं आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोर, गर्दुले चोरी करतात. महत्त्वाचं म्हणजे स्त्रिया, ज्येष्ठ, अंध, अपंगांची यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. एवढी गंभीर समस्या असतानाही वसाहतीत नवे पथदिवे लावण्याकडे बीपीटी अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप ही करण्यात येतोय.

पुढील बातमी
इतर बातम्या