धुलिवंदनानिमित्त आरपीएफ पोलिसांची सुरक्षा गस्त

वडाळा - धुलिवंदन सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या वतीने हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकात आणि स्थानकालगतच्या लोकवस्त्यांमध्ये सोमवारी गस्त घालण्यात आली. तसच रंगपंचमी हा सण साजरा करताना संयम ठेवा आणि शांतता राखा असे आवाहनही पोलिसांनी केले.

हार्बर मार्गावरील नऊ स्थानक वडाळा रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पोलिसांच्या अंतर्गत येत असल्याने सँडहर्स्ट रोड स्थानक ते कुर्ला, किंग्ज सर्कल आणि स्थानकालगतच्या लोकवस्तीमध्ये गस्त घालण्यात आली. तसेच लोकवस्तीतून गस्त घालताना तेथील नागरिकांना चालत्या लोकलवर फुगे मारू नका असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही गस्त घालण्यात आल्याचं वडाळा आरपीएफ प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर शिंदे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या