तळीरामानांच गंडा

चेंबूर - गेल्या काही वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनेक बनावट दारुचे अड्डे उध्दवस्त करण्यात आले आहेत. अशाच प्रकारे नाताळ आणि न्यू इअरसाठी मोठ्या प्रमाणात दारुची उलाढाल होते. सध्या शहरात अशा प्रकारे बनावट दारू सर्रास विकली जातेय. त्यामुळे नववर्षांच्या जल्लोशामध्येही या टोळीकडून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बनावट दारुची विक्री केली जाणार आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागानं काही पथकं तयार करून सर्च आॅपरेशन सुरू केलंय. तसंच या पथकांकडून वाहनांचीही तपासणी केली जातेय.

मोठ-मोठ्या हॉटेल्समधून ही टोळी महागड्या दारुच्या रिकाम्या बॉटल बॉक्ससह खरेदी करतात. तर काही बॉटल कचराविक्रेते आणि भंगारवाल्यांकडून खरेदी करतात. त्यानंतर बॉटलला साफ करून शंभर ते दीडशे रुपयांची बनावट दारू  त्यात भरली जाते. याच बॉटलमध्ये व्यवस्थीत पॅकिंग करून ती पुन्हा समान्य ग्राहकांना 1 ते 15 हजार रुपयांना विकली जाते. काही वेळा विदेशातून दारू आणल्याचं सांगत ही टोळी कमी किंमतीच्या दारुची विक्री करते. 

पुढील बातमी
इतर बातम्या