मालाडमध्ये मंदिरातून 7 लाखांचे दागिने लंपास

मालाड - सुंदरनगरच्या अंबे माता मंदिरामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मंदिरामधील गणपती, हनुमान आणि दुर्गामातेच्या मूर्तीवर चढवलेला सोन्याचा साज आणि माळा चोरून चोर पसार झाल्याचे समोर आले आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 2 ते 4 च्या सुमारास ही चोरी झाली. सुमारे 7 लाखांपर्यंतचा ऐवज चोराने लंपास केला. पहारेकरी बहादुर हा सुंदरनगर वेल्फेअरच्या सोसाटीमध्ये पहारा देत होता तेव्हा चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने लगेच आजूबाजूच्या लोकांना बोलावून ही बाब निदर्शनास आणून दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या