संजय पांडेंच्या महासंचालक पदाआड येतंय कोण?

  • मिलिंद सागरे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मुंबई - आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची राज्याचे महासंचालक बनण्याची संधी हिरावली जाणार आहे. नऊ वर्षांपूर्वी मंजूर केलेली रजा रद्द करून आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्या सेवेतील दोन वर्ष आठ महिने कपात केल्याचा फटका त्यांना बसणार आहे.

या निर्णयमुळे संजय पांडे यांच्यापेक्षा ज्यूनियर असलेल्या अधिका-याकडे महासंचालक पद जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संजय पांडे यांनी 12 एप्रिल 2000 साली राजीनामा दिला होता. मात्र राज्य सरकारने दोन वर्ष त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये 2002 साली पुन्हा संजय पांडे यांनी नियमानुसार राजीनामा मागे घेतला. त्यावेळी त्यांना सेवेत घेण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र "कॅट" ने त्यांना सेवेत घेण्याचे आदेश दिले. मात्र या निर्णयाच्या विरोधात राज्यसरकार गेले. मात्र न्यायालयातही राज्य सरकारला माघार घ्यावी लागली. 12 एप्रिल 2000 पासून त्यांना सेवेत घेण्याचे आदेश देत दोन वर्ष आठ महिनेच्या सुट्टीला 'असाधारण रजा' म्हणून न्यायालयाने मंजुरी दिली होती. ही सुट्टी ग्राह्य धरून राज्य सरकारने दोन वेळा संजय पांडे यांना पोलीस उप महानिरीक्षक व महानिरीक्षक अशी बढती दिली होती. आता 12 एप्रिल 2000 ते 30 जून 2002 कालावधीला 14 वर्षांनी 'अकार्य' म्हणजे सेवेत नसल्याचा निर्णय घेत त्यांच्या एकूण सेवेत दोन वर्ष आठ महिन्याची कपात केलीय. संजय पांडे हे जानेवारी 2017 ला राज्याचे पोलीस महासंचालक या पदासाठी पात्र ठरत आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्णयामुळे कनिष्ठ अधिका-यांना हे पद जाणार की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीय. दरम्यान या बाबत पांडे यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.

पुढील बातमी
इतर बातम्या