१३ व्या मजल्यावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या

इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून उडी घेऊन महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी नागपाडा येथील ऑर्चिड एनक्लेवमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी महिलेचे नाव सांगण्यास नकार दिला. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. 

३६ वर्षीय मृत महिला ही मूळची मीरा रोड येथील आहे. लग्नाच्या ७ वर्षांनंतर तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून ती नेहमी तणावात होती.  तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर ती आई-वडिलांकडे राहत होती. मात्र, नुकतेच तिच्या आईवडिलांचेही निधन झाले झाल्याने ती तणावात होती. त्यामुळे तिचे काका तिला घरी घेऊन गेले. नागपाडा येथील ऑर्चिड एनक्लेवमध्ये ती काकांच्या घरी राहात होती.

सतत तणावात असल्याने शुक्रवारीदेखील तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, कुटुंबीयांनी तिला अडविले. त्यानंतर शनिवारी सकाळी तिने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलीस तेथे दाखल झाले.

 

पुढील बातमी
इतर बातम्या