मानखुर्दमधील मशींदीच्या भोंग्या विरोधात आवाज उठवल्याप्रकरणी करिश्मा भोसले या तरुणीला मानखुर्द पोलिसांनी १४९ (cognisable offences) अंतर्गत नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी करिश्माने परिसरातील एका मशिदीला भेट दिली होती. त्यावेळी तिने मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. त्यावरून स्थानिक आणि तिच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मशिदीवरील भोंद्यावरून करिश्माने तिच्या एक व्हिडिओ ही शेअर करत तिचे मत मांडले होते. त्या व्हिडिओत तिने माझा अजानला विरोध नाही, मी त्या ठिकाणी फक्त भोंग्याचा आवाजा कमी करण्याची विनंती केली. मात्र स्थानिकांनी त्यावरून माझाशी वाद घातला. आमचं कोणाशी शत्रुत्व नाही. अजानला ही विरोध नाही. मात्र लाऊडस्पिकरवर अजान ज्या आवाजातून होते त्याला विरोध आहे. अशा स्पष्ठ शब्दात तिने तिची भूमिका सोशल मिडियावर व्हिडिओ अपलोड करून व्यक्त केली. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर तिला स्थानिकांकडून ही धमकी मिळाल्याचे ही सांगितले. कालांतराने या वादात राजकिय नेत्यांनी ही उडी घेतली.