अंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराचं मंगळवारी २४ तास ऑनलाईन दर्शन सुरू

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक गणपती मंदिर मंगळवारी २४ तास ऑनलाईन दर्शनासाठी सुरू राहणार आहे. कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने मंदिर न्यासाने हा निर्णय घेतला आहे. गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं, अशी विनंती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केली आहे.

श्री सिद्धिविनायक टेम्पल अ‍ॅप डाउनलोड करून घरातूनच श्रींच्या दर्शनाचा व आरतीचा लाभ घ्या, असं आवाहन करण्यात आलं आहे. मंगळवार २७ जुलै रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा देखील सांगण्यात आली आहे.

 त्यानुसार सोमवार मध्यरात्री १२.१० ते १२.२० श्रींची काकड आरती, मध्यरात्री १२.२०ते १.२० पर्यंत श्रींची महापूजा व अभिषेक, मंगळवार पहाटे ३.३० ते ४ वाजेपर्यंत श्रींची महाआरती, दुपारी १२.०५ ते १२.२० पर्यंत श्रींनी नैवेद्य, सायंकाळी ७ वाजता श्रींची धुपारती, रात्री ८.३० ते रात्री १० वाजेपर्यंत श्रींची महापूजा, नैवेद्य, महाआरती आणि रात्री १०.३० वाजता शेजारती नंतर मंदिर बंद होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या