सत्यशोधक मनोहर कदम स्मृती जागर

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • संस्कृती

परळ - सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्राच्यावतीनं सत्यशोधक मनोहर कदम स्मृती जागर निमित्त साहित्य आणि राजसत्ता या विषयावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परळ येथील सोशल सर्व्हिस लीग शाळेच्या सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन करण्यासाठी प्रागतिक विचारवंत प्रा. पुष्पा भावे उपस्थित होत्या. तसेच प्रख्यात विदुषी दुर्गा भागवत यांच्या निवडक उताऱ्यांचे आणि कवितांचे अभिवाचन अाशा शेलार यांनी केलं. जेव्हा एखादा साहित्यिक देशाच्या विषयावर बोलतो तेव्हा त्याला राजसत्ता साहित्यिक असं म्हटलं जातं. इतिहासकालीन राजे महाराजांच्या काळातदेखील राजकारण हा विषय कार्यरत होता. हे राजकारण म्हणजं कचेरी ज्यात हिंसक विचारांनी भरलेला समुद्र आहे. असं मत प्रा. बजरंग तिवारी यांनी व्यक्त केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या