‘ग्लोबल सिंधीज’ पुस्तकाचं प्रकाशन

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • संस्कृती

मुंबई - ग्लोबल सिंधी काउंसिलचे अध्यक्ष डॉ. राम जव्हारानी यांनी लिहिलेल्या ‘ग्लोबल सिंधीज' इनहेरिटर्स ऑफ द इंड्स व्हॅली सिव्हिलायझेशन’ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते बुधवारी करण्यात आलं. या वेळी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी, प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी,रमेश तौरानी, दूरदर्शऩचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्यासह सिंधी समाजातले अनेक मान्यवर उपस्थित होते. सिंधी समाज आज जगभर विखुरला गेल्यानं सिंधीयत अर्थात सिंधी भाषा, लोकरीती आणि संस्कृती टिकवणं हे एक आव्हान झालंय. सिंधी समाजानं बिगर सिंधींनाही आपली भाषा शिकण्यासाठी आणि सिंधी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करावं. त्यासाठी आवश्यक असल्यास शिष्यवृत्ती द्यावी, अशी सूचना राज्यपाल विद्यासागर राव यांनी या वेळी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या