३३ टक्के मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित - हेमंत टकले

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • शिक्षण

राज्यातील सुमारे ९ लाख अल्पवयीन मुली या बालकामगार आहेत. तर प्राथिमिक शिक्षण घेणाऱ्या जवळपास ३३ टक्के मुली माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नाहीत असं एका संस्थेच्या पाहणी अहवालातून समोर आले आहे, अशी धक्कादायक माहिती आमदार हेमंत टकले यांनी विशेष उल्लेखाच्या सूचनेत विधान परिषदेत मांडली.

९ लाख मुली बालकामगार

राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये करण्यात आलेल्या पहाणीनुसार १५ ते १९ या वयोगटातील ४९ लाख मुली आहेत. त्यापैकी १८.४ टक्के म्हणजे साधारण ९ लाख मुली या वेगवेगळया स्वरुपात बालकामगार म्हणून काम करतात. त्यामध्ये ग्रामीण भागातील मुलींचं प्रमाण अधिक आहे.

नंदुरबार, गडचिरोली, जालना, हिंगोली या जिल्हयात ३१ ते ३९ टक्के मुली कामगार आहेत. तर ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगावमध्ये ३० टक्के मुली कामगार आहेत. या सर्व मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत. अनियंत्रित क्षेत्रांमध्ये कामगार मुलींची संख्या अधिक आहे. त्यामुळे माध्यमिकस्तरावर मुलींच्या शाळा गळतीचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र आहे. या मुलींना प्रवाहात आणण्यासाठी त्यांना कामाच्या ठिकाणी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दयावी. माध्यमिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी तसंच त्यांना सायकली द्याव्यात या सूचनांचा शासनाने गांर्भियाने विचार करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी विशेष उल्लेखाद्वारे आमदार हेमंत टकले यांनी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या