मोठी बातमी! ९वी, ११वीचे विद्यार्थी होणार सरसकट पास

९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, परीक्षेविनाच त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागानं दिली. या आधी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशा सूचना होत्या. मात्र त्यावर पुन्हा एकदा विचार करण्यात आलाय. आता  ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केलं जाणार आहे, असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. 

'राज्यात कोरोनाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. १ली ते ८वी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल यामाध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवलं. खरतर १ली ते ४थीच्या शाळा सुरु झाल्या नाहीत. तर ५वी ते ८वी या शाळा सुरु झाल्या. पण काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. पण विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता', असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

१०वी आणि १२वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार १०वीची लेखी परीक्षा २९एप्रिल ते २०मेच्या दरम्यान होणार आहे, तर १२वीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे रोजी होणार आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १०वी आणि १२वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

पुढील बातमी
इतर बातम्या