शाळांच्या मनमानीवर पालिकेचा लगाम

अतिरीक्त फी वाढवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितल्यानंतर शालेय गणवेश आणि पुस्तकांची खरेदी शाळेतूनच सक्तीची करणाऱ्या शाळांवर आता चाप बसणार आहे. खासगी, अनुदानीत आणि विनाअनुदानीत शाळांना आता शैक्षणिक साहित्याची खरेदी सक्तीची करू नये, असे आदेश पालिकेने शाळांना दिले आहेत.

पालिकेच्या शिक्षण विभागाकडून अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना परिपत्रक देण्यात आलं आहे. त्यानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तक, शाळेतूनच विकत घ्यायची सक्ती शाळा करू शकणार नाही. काही दिवसांपूर्वी बॉम्बे बुक सेलर आणि पब्लिशर्स असोसिएशनने याविषयी शालेय विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत, पालिकेने शाळांच्या मनमानीवर लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या