वरळीतील पालिकेच्या शाळेनं सर्वोत्तम शाळा राष्ट्रीय सर्वेक्षणात पटकावला देशात ४था क्रमांक

देशातील सर्वोत्तम शाळांच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात वरळीतील महापालिकेच्या शाळेनं ४था क्रमांक पटकावला आहे. १० सर्वोत्तम शाळांमध्ये चौथा क्रमांक पटकावला असून, महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीची दखल घेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत महापालिका शिक्षण विभागाचं अभिनंदन केलं आहे.

बंगळुरू इथं एज्युकेशन वर्ल्ड इंडिया या संस्थेनं देशभरातील २०२०-२१च्या स्पूल रँकिंगची घोषणा केली. देशातील २ हजार सर्वोत्तम शाळांची विविध श्रेणीत निवड केली. शाळांचा शैक्षणिक स्तर, शिक्षकांचा दर्जा, विद्यार्थ्यांवरील वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, क्रीडा तसेच डिजिटलायझेशन अशा १४ विविध पातळ्यांवर ही निवड करण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेनं १९९९ साली वरळीतील मुंबई पब्लिक इंग्लिश स्पूल ही शाळा सुरू केली. मुंबई आयआयटीच्या केंद्रीय विद्यालयानंही वरळी पब्लिक स्पूलसह संयुक्तपणे ४था क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणात १ला क्रमांक त्रिवेंद्रमपूर येथील केंद्रीय विद्यालय, २रा क्रमांक नवी दिल्ली, द्वारका येथील राजकीय प्रतिभा विकास विद्यालय, ३रा क्रमांक कोझीकोडे येथील जीव्हीएचएसएस (मुलींची शाळा) या शाळांनी पटकावला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या