विद्यापिठातील मुलांच्या वसतिगृहाची होणार दुरुस्ती

विद्यापिठातील कर्मवीर भाऊराव पाटील मुलांच्या वसतिगृहाची पाहणी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी बुधवारी केली. यावेळी लवकरात लवकर वसतिगृहाचे दुरुस्ती करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिले. या वसतिगृहाची इमारत मोडकळीस आली असून, स्लॅब देखील पडायला आल्याने इमारत लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.वसतिगृहात सध्या 80 विद्यार्थी राहतात. एकूण 120 खोल्या या वसतिगृहात आहेत. मात्र वसतिगृहातील खोल्या मोडकळीस आल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी जीव मुठीत धरून रहात आहेत.

विद्यापिठाच्या वसतिगृहाची अवस्था मला समजताच मी तात्काळ यावर बैठक घेतली आणि विद्यापिठाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आदेश दिले. यासाठी सव्वा कोटींचं टेंडर काढण्यात आलं आहे. लवकरात लवकर हे काम सुरू करण्यात येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल.

रवींद्र वायकर, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री

ही इमारत 40 वर्ष जुनी आहे. या इमारतीचे ऑडिट करण्यात आले आहे. त्यामुळे इमारतीच्या स्ट्रक्चरमध्ये काही चूक नाही. त्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येईल.

एम. ए. खान, रजिस्ट्रार

पुढील बातमी
इतर बातम्या