CBSE १०वी, १२वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सीबीएसईनं १०वी आणि १२वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १ ते १५ जुलै २०२० दरम्यान होणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनीही हे टाइमटेबल ट्विट केले आहे. त्याचप्रमाणं, कोणता पेपर कधी, कोणत्या सत्रात याविषयीची सविस्तर माहिती बोर्डानं दिली आहे. 

१०वी आणि १२वीच्या एकूण २९ विषयांच्या परीक्षा होणार आहेत. कोणत्या परीक्षा पूर्ण देशभर होणार आहेत आणि कोणत्या केवळ ईशान्य दिल्लीत होणार आहेत, ते या वेळापत्रकात सविस्तरपणं नमूद करण्यात आले आहे. सर्व परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार का नाही याबाबात पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, आता निकाल जाहीर केल्यानं याला पूर्णविराम देण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या