सीबीएसई बारावीचा निकाल शनिवारी

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

काही दिवसांपूर्वी आयसीएसई बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण (सीबीएसई) बोर्डाचा बारावीचा निकाल २६ मे २०१८ शनिवारी जाहीर करण्यात येणार आहे. सीबीएसई अधिकृत वेबसाईटवरून १२ वीच्या निकालाची घोषणा करण्यात आली.

ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार असून cbse.examresults.net, cbseresults.nic.in, results.gov.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

किती विद्यार्थी?

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता बारावीची परीक्षा ५ मार्च ते १३ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आली असून ११,८६,३०६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यांत ६,९०,४०७ विद्यार्थी आणि ४,९५,८९९ विद्यार्थीनींचा समावेश आहे. ही परीक्षा देशभरात ४,१३८ केंद्रावर घेण्यात आली होती. तसंच सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र उच्च माध्यमिक बोर्डाचा निकालही जाहीर करण्यात येणार आहे.


हेही वाचा-

पहिली, आठवीच्या पुस्तकांची प्रतिक्षा कायम


पुढील बातमी
इतर बातम्या