CBSE: नवीन वर्षाच्या सुरूवातील होणार १०वी, १२वीच्या परीक्षा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वी, १२वीच्या बोर्ड परीक्षा नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे १ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२१ या कालवधीत आयोजित करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जाणार असल्याचं सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी म्हटलं.

मिळालेल्या माहितीनुसार, 'बोर्ड परीक्षा निश्चित स्वरुपात होणार आणि लवकरच कार्यक्रम घोषित केला जाणार. सीबीएसई यासंदर्भातील योजना बनवत आहे. मार्च-एप्रिल दरम्यान आम्ही आमची पुढील वाटचाल समोर ठेवली होती. आमच्या शाळा आणि शिक्षकांनी बदल स्विकारला. शैक्षणिक उद्दिष्टांसाठी नव्या तंत्रांचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेतले. काही महिन्यातच ऑनलाइन वर्ग सुरु झाले, अॅप्स आले,' असं २० नोव्हेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमात अनुराग त्रिपाठी यांनी म्हटलं.

लवकरच सीबीएसईच्या संकेतस्थळावर cbse.nic.in वर याबाबतची सविस्तर माहिती अपडेट केली जाणार आहे. मागील अनेक दिवसांपासून सीबीएसई बोर्डाची इयत्ता १०वी, १२वीची परीक्षा होणार की नाही याविषयावर चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चेला पुर्णविराम देत सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या