CBSE शिक्षण मंडळाचा १२ वीचा निकाल जाहीर

ज्या दिवसाची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा होती, तो दिवस अखेर उजाडला आहे. CBSE शिक्षण मंडळाचा १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीचा एकूण ९९.३७ टक्के इतका निकाल लागला आहे. यंदाही मुलीनींच बाजी मारली आहे. एकूण ९९.६७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९९.१३ टक्के मुलांनी बाजी मारली आहे. १२वी चा निकाल लावताना १०वी च्या गुणांनाही महत्तव देण्यात आले आहे. या निकालात दहावीच्या 30 टक्क्यांपर्यंत महत्तव दिलं जाणार आहे.

ऑनलाईन निकाल असा पाहा

  • सीबीएसईच्या cbseresults.nic.in आणि cbse.gov.in या दोन्ही अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. 
  • वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना रिझल्ट टॅब (Result Tab)क्लिक करावं. 
  • त्यानंतर निकाल पाहण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि इतर आवश्यक माहिती द्यावी लागेल. त्यानंतर पुढे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कॉम्प्युटरवर दिसेल. 
  • विद्यार्थ्यांना निकालाची प्रत डाऊनलोड करुन प्रिंटही घेता येईल. 
पुढील बातमी
इतर बातम्या