सीबीएसई बोर्ड दहावी, बारावी दुसऱ्या टर्मची परीक्षा ऑफलाईन

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) 10वी आणि 12वी दुसऱ्या टर्मची परीक्षा (Second term exam) ऑफलाईन होणार आहे. ही परीक्षा २६ एप्रिलपासून घेतली जाणार आहे. CBSE कडून लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोना संकटामुळे सीबीएसई कडून १९ वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. यातील १० ची टर्म-1 बोर्ड परीक्षा १७ नोव्हेंबरला महत्वाच्या विषयांसाठी आणि ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान सोप्या विषयांसाठी घेण्यात आली होती.

त्याचवेळी, १२वी वर्गाच्या सोप्या विषयांच्या परीक्षा १६ नोव्हेंबर आणि प्रमुख विषयांच्या परीक्षा १ ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. बोर्डाकडून या परीक्षेचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र ते लवकरच जाहीर होतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

टर्म – २ परीक्षेत विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव आणि सब्जेक्टिव अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातील. टर्म – 1 परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाचे प्रश्न विचारण्यात आले होते. बोर्डाकडून परीक्षेसाठी सॅम्पल पेपरचाच फॉरमॅट फॉलो केला जाईल.

वेळापत्रक लवकरच बोर्डाची अधिकृत वेबसाईट https://www.cbse.gov.in/ वर जाहीर केलं जाणार आहे.

सीबीएसई पहिल्यांदाच १० वी आणि १२वीची अंतिम परीक्षा दोन टर्ममध्ये आयोजित करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मागील वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून परीक्षा आयोजित करण्यात आली नव्हती. त्यामुळे निकालासाठी एख वैकल्पिक मूल्यांकन करण्यात आलं होतं.

सीबीएसईच्या प्रॅक्टिकल परीत्रा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाऊ शकतात. मात्र, बोर्डाकडून अद्याप प्रॅक्टिकल परीक्षेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


हेही वाचा

१२वीच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यास सुरूवात

स्कूल बसच्या भाडे शुल्कात होणार ३० टक्क्यांनी वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या