दहावीचा निकाल लागूनही विद्यार्थी पहिल्या मेरिट यादीच्या प्रतिक्षेत

महाराष्ट्र (maharashtra) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात 13 मे रोजी जाहीर झाला.

10 वी च्या निकालानंतर आता 11वी त प्रवेश घेऊन नव्या कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थी खूप उत्सुक आहेत. मात्र या निकालाला आता महिन्याभराचा कालावधी उलटून गेला असला तर मुंबईत (mumbai) ज्युनिअर कॉलेजच्या प्रवेशासाठीची (FYJC) पहिली मेरिट यादी (merit list) अद्यापही लागलेली नाही.

तसेच याबाबत राज्याच्या अधिकाऱ्यांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही किंवा काही सूचनाही दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी मात्र संभ्रमात आहेत.

13 मे रोजी दुपारी 1 वाजता 10 वीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. त्या आधी शिक्षण मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण राज्याचा तसेच विभागवार निकाल जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणेच यंदाही 10वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली.

मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 टक्के तर 92.31 टक्के मुलं उत्तीर्ण झाली होती. कोकण विभागाचा नेहमीप्रमाणे सर्वात अव्वल होता. कोकण विभागाच निकाल सर्वाधिक 98.82% तर नागपूरचा निकाल सर्वात कमी 90.78% टक्के लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांना 11 वीच्या प्रवेशाची उत्सुकता होती, मात्र जून संपत आला तरी कॉलेज्या पहिल्या यादीबद्दल अजूनही अपडेट्स नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, FYJC प्रवेशासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात आले आहे. मात्र, सॉफ्टवेअर कार्यान्वित करताना काही त्रुटी किंवा अडचण निर्माण झाली, तर यादी जाहीर करण्यासाठी नवीन तारीख जाहीर करावी लागेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सोमवारी राज्य शासनाने एक शासकीय निर्णय (GR) काढून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाचा अल्पसंख्याक कॉलेजांमध्ये लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, अल्पसंख्याक कॉलेजांमध्ये नवीन आरक्षण आकृतीबंधानुसार जागा वाटप करण्यात आले आहे.


हेही वाचा

5 जुलैच्या मोर्च्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार: संजय राऊत

हिंदी सक्तीविरुद्ध राज ठाकरे 5 जुलैला उतरणार रस्त्यावर

पुढील बातमी
इतर बातम्या