‘डॉन बॉस्को’ शाळेचा अमृत महोत्सव

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

माटुंगा - ‘डॉन बॉस्को’ शाळेनं वैभवशाली परंपरा जपत 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केलाय. अत्यंत अभिमानानं भूतकाळातील सुखद आठवणींसोबत या प्रवासातल्या महत्त्वपूर्ण घटनांची उजळणी यानिमित्तानं होणार आहे. 16 नोव्हेंबरला त्याची सुरुवात होईल.

प्रख्यात चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट, अभिनेते अनंत महादेवन, शशी कपूर, अक्षय कुमार, गायक हरिहरन, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, डॉ. कीर्ती पुनामिया, डॉ. राम छेडा, डॉ. संदीप राणे, क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर, रवी शास्त्री आणि जतीन परांजपे आदी नामवंत याच शाळेचे विद्यार्थी. मुंबईतल्या रोमन कॅथलिकांच्या सेलशिअन या धार्मिक संस्थेच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड म्हणता येईल, अशा या महत्त्वाच्या टप्प्यावर या प्रदीर्घ कालावधीचा थोडक्यात आढावा घेतला जाईल. मुंबईच नव्हे तर राज्य आणि संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये या शाळेची गणना होते. डॉन बॉस्को’ शाळेचं IN VIRTUE ROBUR असं ब्रीदवाक्य आहे. लॅटिन भाषेतल्या या वाक्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की ,‘मूल्यं हीच आमची शक्ती आहे.’ या आनंद सोहळ्याचा एक भाग म्हणून अनेक आंतरशालेय उपक्रम यानिमित्तानं आयोजित होतील. वर्षभरानंतर रेक्टर मेजर रेव्हरंड फादर अॅंजेल फर्नांडिस यांच्या भेटीनं या महोत्सवाची सांगता होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या