एमबीए सीईटीचा निकाल जाहीर

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • शिक्षण

राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आला. यावेळी एकूण ९८ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. 

या संकेतस्थळावर निकाल जाहीर

राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार असून परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३७ विद्यार्थ्यांना या परीक्षेत शून्य गुण मिळाल्याचे आकेडवारीतून समोर आले आहे.

९८ हजार ६०६ जणांनी दिली परीक्षा

मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे १० आणि ११ मार्च रोजी सीईटीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १ लाख ६ हजार ४४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९८ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे डीटीईने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

या आकडेवारीनुसार या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्याला २०० पैकी १६५ गुण मिळाले आहेत. गेल्यावर्षी राज्यभरात एमबीएच्या एकूण ३४ हजार जागा होत्या. त्यापैकी ३० हजार जागांवर प्रवेश झाले होते. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी किती जागा उपलब्ध होत आहेत. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या