मेरिट ट्रॅक कंपनीची हकालपट्टी अटळ

निकालात घोळ घालणाऱ्या मेरिट ट्रॅक कंपनीला मुंबई विद्यापीठाने 1.18 कोटी दिले हे माहितीच्या अधिकारातून उघड झाल्यानंतर विद्यापीठावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. यावर आता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येत्या वर्षात नवीन निविदा काढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता मेरिट ट्रॅक कंपनीची लवकरच हकालपट्टी होणार अशी चिन्ह दिसत आहेत.

नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्याबाबत संकेत

पुन्हा निकालात गोंधळ होऊ नये म्हणून विद्यापीठाने अनेक नव्या सूचना मेरिट ट्रॅक कंपनीला केल्या आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनातील परीक्षांसाठी याची अंमलबजावणी करण्यात येईल. मात्र येवेळी त्यांनी नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्याबाबत संकेत दिले आहेत.

सरकारी प्रतिनिधी म्हणून भूषण गगरानींची निवड

त्याचबरोबर संजय देशमुख यांची कुलगुरु पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी एक समिती गठित केली होती. त्या शोध समितीत सरकारी प्रतिनिधी म्हणून भूषण गगरानी यांची निवड करण्यात आल्याची माहितीही तावडे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या