Coronavirus Updates: १ ते ८वी परीक्षा रद्द - शिक्षणमंत्री

करोनाच्या व्हायरचा प्रादुर्भाव वाढत असून राज्य सरकारनं शालेय शिक्षणाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीत इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय इयत्ता ९ वी ते ११ वीची परीक्षा एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे, मुंबईसह अनेक शहरात नागरिक बाहेर जाण्याचं टाळत आहे. राज्य सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, प्रवास टाळावा, तसेच स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. गेल्या आठवड्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढल्यानं सरकारनं शाळा महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले.

लोकांची गर्दी होणारी ठिकाणही बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. करोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. त्यामुळे शालेय परीक्षा कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यासंदर्भात अखेर सरकारनं निर्णय घेतला आहे. 

शिक्षण विभागाच्या बैठकीत निर्णय :

  • १ ली ते ८ वीपर्यंतच्या परीक्षा रद्द
  • इयत्ता ९ वी ते ११ वीची परीक्षा एप्रिलनंतर
  • ३१ पर्यंत इयत्ता १ली ते ९वीचे शिक्षक घरून काम करतील
  • इयत्ता १० वीचे शिक्षक कार्यरत राहातील
  • पेपर चेकींगबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही 


हेही वाचा -

पुढील बातमी
इतर बातम्या