११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरू

अकरावी प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १६ ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करता येणार आहेत. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. प्रवेश प्रक्रियेपूर्वी राज्य मंडळातर्फे सीईटी घेतली जाणार आहे. या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पुर्व तयारी सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सरावाठी १३ ऑगस्टपासून तात्पुरती नोंदणी (मॉक डेमो) करता येणार आहे. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भागात विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती त्यासोबत शुल्क भरुन अर्ज लॉक करायचा आहे. सीईटी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सीईटीचे गुण आणि पसंती क्रमांक यासाठी अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे. त्याचं वेळापत्रक काही दिवसांमध्ये संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी मॉक डेमोसाठी भरलेली ही सर्व माहिती १३ ऑगस्टनंतर डिलीट केली जाणार आहे. त्यानंतर १६ ऑगस्टपासून प्रत्यक्षात ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरवा लागणार आहे. https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालात १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची संख्या पाहता सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज भरला नसल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक २ लाख ५५ हजार ६४३ अर्ज मुंबई विभागातून भरले गेले आहेत, तर सर्वात कमी २० हजार ५६६ अर्ज कोकण विभागातून भरले गेले आहेत. मुंबई खालोखाल पुणे विभागातून १ लाख ३२ हजार २५५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. तर २ हजार ७३४ अर्ज जुन्या विद्यार्थ्यांचे आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या